Brain Rules (Marathi)


Price: ₹325 - ₹215.00
(as of Sep 05, 2023 21:29:41 UTC – Details)


Good read. Value for money. Do buy and read. Should not take more than a few hours to read. Entertaining. Brillant book by VP Kale. He writes close to life. Light hearted & relaxing.

From the Publisher

Brain Rules (Marathi)

Brain Rules (Marathi)Brain Rules (Marathi)

आपल्यातील बहुतेक जणांना आपल्या डोक्यात खरोखर काय घडते, याची तीळमात्र माहिती नसते. असे असूनसुद्धा प्रत्येक उद्योजकास, पालकास आणि शिक्षकास ज्याची माहिती असायला हवी ते सर्वकाही मेंदूच्या शास्त्रज्ञांनी उघडकीस आणले आहे. उदा. यात अतिशय उत्तम प्रकारे काम करण्यासाठी मेंदूला शारीरिक हालचालींची गरज आहे हे तथ्य समाविष्ट आहे.

आपण कशा प्रकारे शिकतो? निद्रा आणि तणावाचा आपल्या मेंदवर काय परिणाम होतो? अष्टावधानी नैपुण्य एक भ्रम व थोतांड का आहे? विसरणे एवढे सोपे का आहे – आणि नवीन ज्ञानाची वारंवार उजळणी एवढी महत्त्वाची का आहे ? पुरुष आणि स्त्रियांचे मेंदू भिन्न असतात हे खरे आहे का?

आपल्या आयुष्यभर केलेल्या कामाच्या अनुभवातून आण्विक जीवशास्त्रवेत्ता जॉन मेडिना मुलांना शिकवताना आणि काम करताना मेंदूची शास्त्रीय माहिती कशी प्रभावित करू शकते याबद्दल माहिती देतात. प्रत्येक प्रकरणात ते मेंदूचा एक नियम विशद करतात, आपले मेंद नक्की कशा प्रकारे काम करतात त्याबद्दलची वैज्ञानिक माहिती सांगतात – आणि मग आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या कल्पना देतात.

या पुस्तकाद्वारे तुम्हाला खालील गोष्टी समजतील

• व्यायामामुळे संज्ञानात्मक क्षमता वाढते.

• प्रत्येक मेंदुची जुळणी (वायरिंग) भिन्न आहे.

• आपल्या मेंदूची रचना शिकणे आणि अन्वेषण कधीही न थांबवण्याच्या दृष्टीने झाली आहे.

• स्मृती चंचल असतात आणि बिघडू शकतात.

• आपल्या शिकण्याच्या क्षमतेशी निद्रेचा थेट संबंध आहे.

• आपली दृष्टी आपल्या इतर संवेदनांवर मात करते.

• तणावाने आपली शिकण्याची पद्धत बदलते.

सरतेशेवटी आपला मेंदू कसा काम करतो आणि त्याचा सर्वोत्कृष्ट उपयोग कसा करावा, हे तुम्हाला या पुस्तकातून कळेल.

“आपल्या मेंदूचा सर्वोत्कृष्ट प्रकारे फायदा कसा करून घेता येतो ते साधे सोपे करण्याचे उत्तम काम करण्यात आले आहे. ते विनोदी, हळुवार आणि गुंगवून टाकणारे आहेत. प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.”

– जॉन रेंटे, एम.डी. ‘स्पार्क अॅण्ड युजर्स गाइड टू द ब्रेन’ या पुस्तकाचे लेखक

“ब्रेन रूल्स हे आजच्या काळातील सर्वांत माहितीप्रद, खिळवणारे आणि उपयोगी पुस्तक आहे.”

– गॅर रेनॉल्ड्स प्रेझेंटेशन झेनचे लेखक

john medinajohn medina

जॉन मेडिना

जॉन मेडिना हे सिएटल वॉशिंग्टन येथील एक प्रथितयश प्रागतिक आण्विक जीवशास्त्रवेत्ता आणि संशोधन सल्लागार आहेत; तसेच ते ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये जीवतंत्रज्ञान विषयाचे संलग्न प्राध्यापक आहेत. ते सिएटल पॅसिफिक युनिव्हर्सिटीच्या ‘ब्रेन सेंटर फॉर अप्लाइड लर्निंग रिसर्च’चे संचालकदेखील आहेत.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan (1 January 2016)
Language ‏ : ‎ Marathi
ISBN-10 ‏ : ‎ 935220106X
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201068
Item Weight ‏ : ‎ 290 g
Dimensions ‏ : ‎ 20 x 14 x 4 cm

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *